सिंहगड रस्ता राजयोग वस्ती (मधुकोष, राजयोग, अर्काडिया, वसंत विहार, मियामी, लगड मळा, सिंहगड दर्शन, सीरीन काऊंटी, क्रॉस ओव्हर काऊंटी, सुंदर संस्कृती या सर्व रहिवाशी संस्था) मधील प्लास्टिक व ई-कचरा संकलन प्रकल्प.
सर्वांचे
मन:पूर्वक अभिनंदन
!!💐💐💐
गेल्या एक ते
दोन महिन्यांपासून प्लास्टिक
व ई-कचरा या विषयात
२ ते ३ बैठका घेऊन
सर्व सोसायटीतील कमेटी
मेंबर आणि स्वयंसेवक (volunteers) यांना
एकत्र करून ह्या
विषयी जागरूकता वाढविण्याचा
प्रयत्न केला गेला, त्यात आपल्या भागातील
१० सोसायटीतील २३
पदाधिकारी प्रत्यक्ष
संपर्क, ३ पर्यावरण
विषयातील तज्ञ आणि
९ स्वयंसेवक (volunteers) चा प्रत्यक्ष सहभाग
स्वानंदचे स्वयंसेवक १० असे एकूण
४५ नागरिकांनी या
अभियानात सहभाग घेतला,
तसेच या अभियानाचे दरम्यान काही सोसायटीतील
हाऊस किपींग (स्वच्छता ) रचना
बघीतली गेली आणि प्रत्यक्ष तेथिल कर्मचार्यांच्या
आणि सोसायटीतील
नागरिकांच्या समस्या या
अभियानात ऐकण्यात आल्या, निश्चितच हे मोठे आव्हान
आहे आपल्या भागात
साधारण ४,००० सदनिका
म्हणजे जवळपास १०,००० नागरिक
आहेत आणि दररोज
प्रचंड प्रमाणात ओला, सुका कचरा , प्लास्टिक व
ई- कचरा वाढत
आहे, त्यामुळे आपली
सर्वांची जवाबदारी वाढली आहे. २२ जानेवारी ला जमा झालेला साधारण ३०० किलो कचरा (प्लास्टिक व ई कचरा) ही एक उत्तम सुरूवात म्हणायला हवी, पण अजून बराच पल्ला
गाठायचा आहे आणि निश्चितच आपण सर्वजण मिळुन हे काम करू शकतो
तसेच *रूद्र ईनव्हारमेन्ट*
फेब्रूवारीच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी प्लास्टिक कचरा
संकलन करेल, कृपया
श्री करजगी काका, राहणार मधुकोष सर्वांना संपर्क करतील.
पुढील आढावा बैठक
*श्री प्रदीप साठे, राहणार मधुकोष, (वस्ती समन्वयक)* ठरवतील
आणि चर्चा करून
पुढील रूपरेषा ठरवूयात.
धन्यवाद
टीप: आपल्या वस्ती मधील कायमस्वरूपी ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन केद्र
सुरू झाले आहे, स्थान - श्री गणेश लाॅंड्री, वसंतविहार सोसायटी *दर रविवार
वेळ १० ते १२*.
No comments:
Post a Comment